तळेरे (प्रतिनिधी) : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती एन्एमएमएस परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयातील इ.८ वी तील कु.सर्वेश सतीश कदम हा विद्यार्थी या राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे.त्याने या परीक्षेत एस.सी विभागातून ८० गुणांसह गुणवत्ता यादीत १२ वे स्थान पटकावले आहे.
या गुणवंत विद्यार्थ्याला प्रतिवर्ष 12000 याप्रमाणे नववी ते बारावी या चार वर्षांसाठी 48 हजार रुपये शासनाकडून शिष्यवृत्ती मिळणार आहे.याच परीक्षेतील प्रविष्ट कु.रिया विश्वनाथ सावंत,सोहम किरण बाक्रे ,सृष्टी दिपक राणे व अमोल दिपक जाधव हे विद्यार्थी या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, यापैकी कु. सृष्टी दिपक राणे व कु.रिया विश्वनाथ सावंत या दोन विद्यार्थ्यिनीं सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्या आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना
‘एन्एमएमएस ‘ विभागप्रमुख सौ.डी.डी.मिठबांवकर, विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.डी.भोसले, विषय शिक्षक श्रीम.प्रियांका सुतार,श्री.ऋषिकेश खटावकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्याचे सर्व कासार्डे विकास मंडळ मुंबईचे सर्व पदाधिकारी, स्थानिक व्यवस्था समितीचे सर्व पदाधिकारी, स्कूल कमिटी सर्व पदाधिकारी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक एन्.सी.
कुचेकर, पर्यवेक्षक एस.डी. भोसले यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.