आचरा (प्रतिनिधी) : मतदान आपला हक्क तो प्रत्येकाने बजावा, लोकशाही बळकट करा अशा अनेक घोषणा देत, घोषवाक्य घेऊन आचरा हायस्कूलच्या मुलांनी प्रशाला ते आचरा तिठा दरम्याने जागृती केली. यावेळी मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक घुटूकडे, तलाठी संतोष जाधव, कोतवाल गिरीश घाडी, पोलीस कर्मचारी मिनाक्षी देसाई, महाभोज सर, पारीपत्ये, शेलार यांसह अन्य शिक्षक, बहुसंख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.
धी आचरा पिपल्स असो . मुंबई संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचराच्या वतीने प्रशाला ते आचरा तिठा पर्यंत लोकसभा मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले . 7 मे 2024रोजी होणाऱ्या लोकसभा मतदानाच्या पाश्वभूमीवर ही रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीमध्ये मतदानाचे महत्व, मतदान – आपला हक्क यावर विद्यार्थ्यानी घोषवाक्ये देऊन नागरिकांना मतदानासाठी आवाहन केले.