स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून ही संजय राऊत ची खोड
आमदार नितेश राणेंचा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : पंतप्रधान मोदी यांची कोल्हापुरात प्रचार सभा आहे. या सभेवर बोलताना संजय राऊत याने कोल्हापूरच्या गादीचा, छत्रपतींच्या घराण्याविरोधात प्रचार करणे म्हणजे महाराजांच्या गादी चा अपमान करण्यासारखे सांगत मोदींच्या सभेवर टीका केली.जर कोल्हापूर ला हा नियम लावत असाल तर साताऱ्यात उदयनराजे भोसलेंविरोधात तुतारी चा प्रचार का करताय ? स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून हा संजय राऊत चा खोटा गुण आहे संजय राजाराम राऊत ने ह्याच गादि कडे वंशजांचे पुरावे मागितले होते, त्याबद्दल आधी माफी मागावी अशा शब्दांत भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले निवडणूक लढवत असतात तुम्ही त्यांच्या विरोधात का प्रचार करता ? असा सवाल नितेश यांनी केला.संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापुरात येऊन छत्रपतींच्या गादी विरोधात प्रचार करतात याचे मला आश्चर्य वाटले नाही असे उपहासाने राऊत म्हणाले त्याचा समाचार घेताना नितेश राणे यांनी राऊत यांच्यावर सडकून टीका केली. कोल्हापूर मध्ये छत्रपतींच्या गादी ला एक न्याय आणि साताऱ्यात दुसरा न्याय करण्यापेक्षा साताऱ्यात उदयनराजे विरोधातील उमेदवारी मागे घ्या मग आम्ही कोल्हापूर बाबत निर्णय घेऊ असे आमदार नितेश राणेंनी सुनावले. ज्यांचे 3 अंकी उमेदवार उभे नाहीत ते देशाला जाहीरनामा देत आहेत. उबाठा आणि शरद पवार गटाचा जाहीरनामा सकाळी मुलांच्या वापरांसाठी केला जाईल असाही टोला नितेश राणे यांनी लगावला.