राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, भाजपा प्रदेश सरचिटणीस दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत आचरा परिसरात राणेंच्या प्रचाराचा झंझावात
आचरा (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व भाजप प्रदेश सरचिटणीस दत्ता यांच्या उपस्थितीत मालवण तालुक्यात आचरा येथे महायुतीचे लोकसभा उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा श्री देव रामेश्वर मंदिरात नारळ ठेऊन गार्हाणे सांगून शुभारंभ करण्यात आला
आज दि.29 एप्रिल रोजी मालवण आचरा येथे श्री देव रामेश्वर मंदिरात नारळ ठेऊन महायुतीचे लोकसभा उमेदवार आदरणीय ना. नारायण राणे साहेब यांच्या प्रचाराचा शुभारंभ राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, भाजप प्रदेश सरचिटणीस दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला त्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य व सरपंच जेरौन फर्नांडिस, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य विलास गावकर, भाजप जेष्ठ नेते बाळू कुबल, राष्ट्रवादी मालवण तालुकाध्यक्ष नाथा मालनकर माजी प.स. सभापती नीलिमासावंत, मालवण खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, संतोष कोदे, राजन पांगे, सुनील जंगले, संतोष कामतेकर, अभय भोसले, मांगरीश सांबारी, डॉ प्रमोद कोलंबकर, पपु कांबळी, सचिन हडकर, जिल्हा प्रतिनिधी गणेश चौगुले, जिल्हा प्रतिनिधी केदार खोत, आदी उपस्थित होते