मा.नगरसेवक तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घरोघरी जात केला प्रचार !

कणकवली शहरात बिजलीनगर, नाथ पै नगर येथे खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारास प्रारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील बिजलीनगर व नाथ पै नगर येथील वार्ड मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार विनायकजी राऊत साहेब यांच्या प्रचाराची सुरवात मा. नगरसेवक तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली. शहरातील नागरिकांशी संवाद साधतं मतदारांना आव्हाहन केले. आपल्या वार्ड मधून खासदार विनायक राऊत यांना जास्तीत जास्त मतादिक्य मिळवून देणार असे आश्वासन नाईक यांनी दिले. यावेळी सुशांत नाईक यांनी मतदारांशी संवाद साधता असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेनबद्दल जनतेमध्ये सहानुभूती असल्याचे दिसून आले. जनतेतून महागाई व बेरोजगारी विरोधाचा नारा यावेळी बघायला मिळाला असे नाईक यांनी बोलताना सांगितले.

यावेळी सुशांत नाईक यांच्या सोबत युवासेना देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर. म्हसकर मॅडम. वनिता सामंत. बंड्या नाईक. समीर देसाई. किरण कदम. सागर सुतार. उत्तम सुद्रिक. रवी भंडारे. चौरे. साई परब. लक्ष्मण हन्नीकोड आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!