विजय घरत यांचे प्रीमियर ट्रस्ट कडून फोंडाघाट प्रा.आ.केंद्रास अत्याधुनिक शेवपेटी प्रदान !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट प्रा. आ.केंद्रास कोकण विकास आघाडी उपाध्यक्ष आणि भाजपा ओबीसी मोर्चा मुंबईचे सचिव विजय घरत यांनी आपल्या प्रीमियर ट्रस्ट तर्फे अत्याधुनिक-वातानुकूलित शवपेटी प्रदान केली. यावेळी सरपंच संजना आग्रे, माजी पंचायत समिती सभापती सुजाता हळदीवे-राणे, संतोष आग्रे, शक्ती केंद्रप्रमुख भाजपाचे विश्वनाथ जाधव, गजानन सावंत, ग्रा. प .सदस्य प्रीतम भोगले, सायली तेली, पांचाळ, मिलिंद लाड, अनिकेत पारकर, दिलीप पारकर, पालकर, विश्वास लाड, सुधाकर सावंत, प्रा. आ .केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यादव, हेमंत फोंडेकर, सुभाष मर्ये, अजित नाडकर्णी, अजय चिके, दीपक इस्वलकर, कोंडके, भालचंद्र राणे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते..
यावेळी सरपंच संजना आग्रे,सुजाता हळदिवे यांनी फोंडाघाट मधील ग्रामस्थांना ऐनवेळी धावाधाव करून कणकवली गाठावी लागत होती. मात्र अत्याधुनिक शवपेटी सुविधेमुळे जनतेची सोय होणार आहे,याबद्दल श्री. घरत यांच्या औदार्य चे त्यांनी कौतुक केले. डॉक्टर यादव यांनी घरत यांना धन्यवाद देताना, या शवपेटीचा उपयोग पंचक्रोशीतील घोणसरी लोरे, वाघेरी, पियाळी, करंजे, डांबरे, हरकुल, या गावांना होणार असल्याबद्दल सांगितले. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना अशा शवपेटीची सुविधा आपल्या ट्रस्ट तर्फे पुरवणार असल्याची ग्वाही, विजय घरत यांनी यावेळी दिली. या सुविधेचा पाठपुरावा आमदार नितेश राणे यांनी केला होता. शेवटी दिलीप पारकर यांनी आभार प्रदर्शन केले.












