वैभववाडी येथे महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने महाराणा प्रताप यांना अभिवादन

वैभववाडी (प्रतिनिधी) : आज देशात सर्वत्र एक कुशल योद्धा,संघटक व राजकारण निपुण राज्यकर्ता, देशभक्ती आणि शौर्याचे प्रतिक असलेल्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने महाराणा प्रताप कलादालन वैभववाडी येथे असलेल्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराणा प्रताप की जय..! जय भवानी..जय शिवाजी..! अशा घोषणांनी उपस्थितांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, संचालक शरद नारकर,दशरथ रावराणे,समस्त रावराणे परीवार, मुख्याध्यापक बी.एस.नादकर. तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!