देवगड (प्रतिनिधी) : लहान मुल म्हणजेच मातीचा गोळा आकार दयावा तशी मुर्ती घडते याच वाक्याप्रमाणे आम्ही विदयार्थी घडवित असताना शाळेच्या संस्थेने व ग्रामस्थांनी तसेच शिक्षकांनी आपल्याला दिलेले सहकार्य यामुळेच आम्ही विदयार्थी घडविण्यामध्ये व यशस्वी मुख्याध्यापक पद सांभाळू शकलो असे मत सेवा निवृत्तीपर सत्कार सोहळयाच्यावेळी वाडा हायस्कुलचे मुख्याध्यापक नारायण माने यांनी व्यक्त केले. वाडा हायस्कुलचे मुख्याध्यापक नारायण माने यांचा सेवा निवृत्तीपर सत्कार देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व देवगड एज्युकेशन बोर्डाचे समन्वय समिती अध्यक्ष ॲड अविनाश माणगांवकर, निरंजन दिक्षित, देवगड एज्युकेशन बोर्डाचे सदानंद पवार, शंकर धुरी, फडके, शांताराम पुजारे, जिल्हा अध्यात्मक महासंघाचे अजय शिंदे, विजय मयेकर, उमेश सुकी, देवगड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हिराचंद तानावडे, माधव यादव,मनिषा माने, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचे सुरेंद्र लांबोरे, अनिल राणे, वाडा हायस्कुलचे मुख्याध्यापक सुनिल घस्ती, माजी मुख्याध्यापक संजीव राऊत, मनोहर भगत आदी जिल्हयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ व विदयार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी सेवानिवृत्ती सत्काराला प्रत्युत्तर देताना मुख्याध्यापक नारायण माने म्हणाले की, देवगड एज्युकेशन बोर्डाच्या वाडा व देवगड हायस्कुलमध्ये 35 वर्षे नोकरी करताना अनेक चांगले अनुभव व चांगले शिक्षक, संस्थाचालक यांचे सहकार्य लाभले म्हणूनच आपण यशस्वी शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून सेवा निवृत्त झालो आहे. ज्या शाळेत विदयार्थ्यांना शिक्षण दिले त्या शाळेला निरोप देताना खुप मन भरुन येत आहे. जरी मी वयोमानानुसार 58 व्या वर्षी सेवा निवृत्त झालो असलो तरी अ.कृ.केळकर वाडा व शेठ. म.ग. हायस्कुल देवगड या शाळांना कधीही विसरु शकत नाही. या ज्ञानाच्या कर्मभुमीत मला अनेक चांगले अनुभव मिळालेले आहेत. या अनुभवांचा उपयोग सेवा निवृत्तीपर येथील विदयार्थ्यांना नक्कीच दिला जाईल. असे त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष ॲड. अविनाश माणगांवकर,अजय शिंदे,उमेश सुकी,सुरेंद्र लांबोरे, मनिषा माने यांनी देखील आपले विचार मांडले. या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला जिल्हयातून बहुसंख्य शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अश्विनी आचरेकर यांनी तर आभार गौरी माने यांनी मानले.
फोटो- सेवा निवत्ती सत्कार समारंभाच्यावेळी बोलताना नारायण माने आदी.