कणकवली (प्रतिनिधी) : कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषीदुतांनी जाणवली या गावांमध्ये विविध प्रात्यक्षिके सादर केले. ग्रामीण कृषी जागरुकता आणि औद्यागिक कार्यनुभव कार्यक्रम याच्या अंतर्गत वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन शेतीविषयक प्रात्यक्षिके घेतली जातात. आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते, ज्यांचा फायदा सर्व शेतकरी बांधवांना होईल. ग्रामपंचायत कार्यालयाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भेट देऊन गावची माहिती घेतली .
या गावांमध्ये उंदीर नियंत्रण, बीज प्रक्रिया, माती परीक्षण आदी प्रात्यक्षिके घेतली व त्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली. गावचे सरपंच अजित पवार, उपसरपंच किशोर राणे, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवरांचे सहकार्य लाभले होते .
या प्रात्यक्षिक कार्यक्रमांमध्ये अनिकेत इचके, अविनाश गुरव, दिगंबर पाटील, सिद्धार्थ पाटील, तुकाराम माळी, हर्ष जाधव, विराज उगले, करण चौगुले, सोमा शेखर, विजय कुमार या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यासाठी त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य पंकज संते, प्रा. सुशीलकुमार मोटे, डॉ. रोहित शेलार, प्रा. किरण भोकरे, प्रा. स्वाती पाटणकर, डॉ. लक्ष्मण व्यवहारे, प्रा.रुपाली ढोले, प्रा. प्रेडिक्सा गावकर, प्रा.रजनी किल्लेदार, प्रा.कविता पुजारी, प्रा.निकिता लांडगे या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले .