उडता मातोश्री चित्रपट काढायची वेळ ; मालकाचा मुलगा ड्रग्स वाल्या लोकांसोबत का असतो ?
राऊत यांच्या खासदार निवासस्थानी राहणारी ती बॉलीवूड अभिनेत्री कोण आणि काय तमाशा झाला हे दाखवायचे काय ?
आमदार नितेश राणे यांचा संजय राऊत ना इशारा
कणकवली (प्रतिनिधी) : संजय राऊतने ड्रग्स ह्या विषयावर बोलून मालकाच्या मुलाला अडचणीत आणू नये. उडता पंजाब नंतर उडता मातोश्री चित्रपट कराढायची वेळ येईल. मातोश्रीचा तिसरा मजला ड्रग्स चे केंद्र आहे.अमली पदार्थाचे धागेदोरे मातोश्री वरूनच मिळतील. कुंपण शेत खात आहे हे लक्षात घ्या. उडता मातोश्री बाबत चिंता करा. तुझ्या मालकाचा मुलगा ड्रग्स वाल्या लोकांसोबत का असतो ? रिझवी कॉलेज च्या मागे असलेल्या बंगल्यात कोणाला भेटतो.? अडीज वर्ष महाविकास आघाडीची सत्ता होती. तुझे मालक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तेव्हा ड्रग्स थांबले का नाहीत. तुम्ही काय प्रयत्न केले. तुमचे गृहमंत्री देशमुख हप्पता वसुलीत जेल मध्ये गेले होते अशी खरमरीत टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.ते कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलत होते.
काल कंगना रणावत ह्या महाराष्ट्र सदन मध्ये जाऊन राहण्यासाठी विचार पूस केली. त्यांना प्रशासनाने नाही म्हटलं त्या निघून गेल्या. यावर संजय राऊत ला मिरच्या झोम्बल्या. कंगना या निवडून गेलेल्या खासदार आहेत तुमच्या सारख्या बँक डोअर आलेल्या नाहीत अशी टीका संजय राऊत यांचेवर केली.कंगना ने महाराष्ट्र सदन मध्ये राहायला मिळेल काय असे विचारले तर टीका करता मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर सचिन वाझे तिकडे किती दिवस राहायचा? त्याच उत्तर कधी देणार असा सवाल केला. संजय राऊत हे महाशय दिल्लीत ज्या खासदार निवासस्थानी राहतात तिथे बॉलीवूड ची कलाकार किती दिवस राहिली ह्याची माहिती द्यायची का. हमाम मे सब नंगे है उगाच बडबड करू नका. तुमच्या बंगल्यात बॉलीवुड हीरोइन चा शूटिंगचा तमाशा जगासमोर आणायचा काय असा खडा सवाल ही केला.
उज्ज्वल निकम यांनी कसाब ला फाशी देण्यास मदत केली मात्र असंख्य दहशतवादी, बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांची बाजू घेणारे मेंनन वकील तुमच्या शरद पवारांच्या बाजूला बसतात.त्यांना कधी प्रश्न केला आहात काय ? आमचे गृहमंत्री सक्षम आहेत. तुमच्या वसुली सरकार पेक्षा आमचे सरकार सक्षम आहे. वेळ आली तर ड्रग माफियांना चौकात फाशी देऊ. असे सुनावले.
धर्माच्या नावाने कोणाला आरक्षण मिळत नाही. विविध जाती आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. मुस्लिम धर्मात पसवंदा सारख्या मागास जाती आहे त्यांना आरक्षण द्या आमची हरकत नाही मात्र धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास आमचा विरोध राहील. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल जाईल. कुठल्याही दुसऱ्या समाजाच्या एक टक्काही आरक्षण न हलवता आरक्षण मिळणार.ओबीसी समाजाला घाबरण्याची गरज नाही. असेही ते म्हणले.
हिंदू समाजामध्ये जी फटाफूट होतेय त्यामुळे नुकसान हिंदू धर्माच होतय. हा हिंदू धर्माच्या सुजान नागरिकांनी विचार करावा असे आवाहन यावेळी आमदार नितेश राणे यांनी केले.