फोंडाघाट (प्रतिनिधी) : ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषीदूत यांनी ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औदयोगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कोळोशी येथे जनावरांचे लसीकरण शिबीर आयोजित केले होते .
आपल्या भारतीय शेती क्षेत्रामध्ये पशूंचे असणारे महत्व लक्षात घेऊन त्या पशूंचे पावसाळा या ऋतुमध्ये विविध आजारांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी पशूंचे लसीकरण करून घेतले. तसेच त्या लसीकरणाच्या वेळी डॉ. झेमणे मॅडम यांनी पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, विविध आजारांपासून प्रादुर्भाव कसा टाळावा याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सदर लसीकरण शिबिराला शेतकऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.