वैभववाडी शहरात आठवडा बाजारात वाहतूक कोंडीची समस्या तिव्र

दत्त मंदिर पासून ५०० मिटर परिसरात नो पार्किंग झोन जाहीर करावा प्रवाशांकडून मागणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाभवे -वैभववाडी नगरपंचायतच्या माध्यमातून वैभववाडी शहरात दत्त मंदिर पासून सांगुळवाडी रोड कडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूला उंच बंदिस्त गटार तर दुसऱ्या बाजूला उंच फुटपाथ बांधल्यामुळे मुळ रस्त्याच्या बाजूला साईट पट्टीचा अभाव आहे. सध्या आठवडा बाजार निमित्ताने आलेले व्यापारी तसेच अन्य नागरीक आपली वाहने दत्त मंदिर ते तालुका स्कुल कडे जाणाऱ्या रस्त्याकडेला पार्क करून बाजारात जातात परिणामी वैभववाडी ते सांगुळवाडी या मार्गावर धावणाऱ्या एस.टी.बस. व अन्य वाहनांना दत्त मंदिर पासून पुढील ५०० मिटर परिसरातून वाहन चालवताना चांगलीच कसरत करावी लागते. परिणामी येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी सदर परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर नगरपंचायत प्रशासनाने दत्त मंदिर पासून सांगुळवाडी रोड कडे ५०० मिटर परिसरात नो पार्किंग झोन जाहीर करुन किंवा दंडात्मक कारवाई करुन उपाययोजना करावी अशी मागणी सांगुळवाडी नावळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!