शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल गौरव ! फोंडाघाट मूळ गावी अभिनंदनचा वर्षाव
फोंडाघाट (प्रतिनिधी) : अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूरच्यावतीने देण्यात येणारा यावर्षीचा “लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार” किंजवडे ता. देवगड येथील आदर्श विद्यामंदिर किंजवडे या प्रशालेचे सहाय्यक शिक्षक आकाश दत्तात्रय पारकर यांना लोकराजा राजर्षी शाहू राज्यस्तरीय पुरस्कार २०२४ राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे दिनांक ३० जून रोजी देण्यात आला. फाऊंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना प्रतिवर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आकाश पारकर हे हे गेली ९ वर्षे किंजवडे हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे मूळ गावी फोंडाघाट येथे पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.












