तिथवली येथे कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण व वृक्षदिंडी

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील तिथवली येथील श्री स्वामी विवेकानंद हायस्कूलचे मुख्यद्यापक मिलिंद मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली १ जुलै हा दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून उद्यानविद्या महाविद्यालय सांगुळवाडी येथील कृषी दूतांनी साजरा केला.

यावेळी कृषी दूतांनी व शालेय विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले व वृक्षदिंडी काढली, व आपल्या सर्वासाठी आरोग्याच्या दृष्टीने झाडे किती महत्वाची आहेत व आपल्या जीवनात शेतीचे किती महत्त्व आहे याविषयी शिक्षकांनी व कृषी दूतांनी माहिती दिली. तर शाळेचे  शिक्षक प्रदिप नाईक व गणेश टकले व कृषी दूत सिद्धेश वारीक, ऋषिकेश भोंग, कौशल पाताडे, ओवेश संसारे, वैभव बंडगर, सुशांत तायडे, शुभम राऊत, अनिकेत मारकड यांनी शालेय विद्यार्थ्यांना भविष्यातील शेतीचे व शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचे महत्त्व पटवून दिले. कृषी दूतांनी व शालेय शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी आजच्या वृक्षारोपण व वृक्षदिंडी कार्यक्रमात आनंदाने सहभाग घेतला. तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता उद्यानविद्या महाविद्यालय सांगुळवाडी प्रा. ए.आर. कामतेकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. पी. एस. सावंत, प्रा. एन.आर.फुटणकर, प्रा. जुवेकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य विद्यार्थ्यांना लाभले.

error: Content is protected !!