तळेरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, (सन-2023-24) वतीने घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या ४ विद्यार्थिनी घवघवीचे संपादन केलेले आहे. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेची कु.समृद्धी प्रकाश चौगुले ही २४२ गुणांसह जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत ५ वी तर कु.सूची सिद्धांण्णा दोडमनी ही २१६ गुणांसह जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत ४० वी येण्याचा मान पटकावला असून या दोन्ही विद्यार्थ्यिनींना ग्रामीण शिष्यवृत्ती लागू झाली आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यिंनींना पाचवी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख-सोनाली पेडणेकर, तसेच ऋचा सरवणकर, पुजा पाताडे व नवनाथ कानकेकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत अथर्व सत्यविजय सावंत हा 196 गुणांसह जिल्हा गुणवत्ता यादीत ४ था तर तालुक्यात २ रा आला आहे तर कु.अद्विता महावीर पोकळे ही १८६ गुणांसह जिल्हा गुणवत्ता यादीत १३ वी तर तालुक्यात ४ थी आली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना आठवी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख सविता जाधव, तसेच ए.ए.कानेकर, विधी मुद्राळे, यशवंत परब यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या दोन्हीही गुणवंत विद्यार्थ्यांना ग्रामीण शिष्यवृत्ती लागू झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, सरचिटणीस रोहिदास नकाशे,स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर व इतर सर्व संस्थापदाधिकारी तसेच प्राचार्य बी.बी.बिसुरे, पर्यवेक्षक एस.व्ही.राणे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. या चारही शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे प्राचार्य बी.बी.बिसुरे व पर्यवेक्षक एस.व्ही.राणे यांनी गुलाब देऊन गुणगौरव केला. या गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
कु.समृध्दी चौगुले
कु.सुची दोडमनी
कु. अथर्व सावंत
कु.अव्दिता पोकळे