आरोग्य विभाग ॲक्शन मोड वर ; आरोग्य विषयक समस्या उद्भवू नयेत म्हणून तीन पथके तैनात
चौके (अमोल गोसावी) : सोमवारी पहाटे पासून मुसळधार पावसामुळे काळसे बागवाडीला कर्ली नदिच्या पाणीपातळीत अचानक वाढ होऊन निर्माण झालेल्या महापूराच्या पाण्याने वेढा दिला होता. त्यानंतर सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली असून आज मंगळवार दिनांक ९ रोजी सकाळपासून बागवाडी वस्तीमधील पुराचे पाणी पूर्णपणे ओसरले असून येथील जनजीवन सुरळीत झाले असून काळसे तलाठी निलम सावंत यांनी पूरग्रस्त घरांची पाहणी करून नुकसानीची माहिती घेण्यास सुरुवात केले. पुराच्या पाण्यामुळे सर्वत्र चिखल झाला असून परिसरातील पाणीसाठेही दूषित झाले असून यामुळे गावामध्ये साथरोग पसरू नये आणि नागरिकांना आरो ग्यविषयक समस्या उद्भवू नये म्हणून आज सकाळ पासून मालवण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर धनगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र चौकेचे पथक सकाळ पासूनच बागवाडी येथे दाखल झाले. आणि वेगवेगळी तीन पथके तयार करून घरोघरी जाऊन मेडीक्लोर वाटप, डॉक्सिसायक्लिन गोळ्यांचे वाटप, परीसरातील विहीरींची पाणी तपासणी, नागरीकांना दूषित पाण्यामुळे आरोग्य समस्या उद्भवू नये म्हणून कोणती खबरदारी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करून काही ठिकाणी किरकोळ उपचारही केले आहेत. आणि पूरग्रस्त नागरीकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन डॉ. सुधीर धनगे यांनी बागवाडी ग्रामस्थांना केले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर धनगे यांच्या समवेत प्रा. आरोग्य केंद्र चौकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबेर मिठारी, आरोग्य सहाय्यक नंदकुमार माहुरे, एस बी डांगमोडेकर, एस एस चव्हाण समुदाय आरोग्य अधिकारी दिव्या शेवडे, आरोग्य सहाय्यीका गौरी कसालकर, वाय. एस सावंत, आरोग्य सेवक डी. जी पिंगुळकर, एल सी. नातेवाड, आनंद वाईरकर, आशा स्वयसेविका साक्षी परब, मंजिरी मेस्त्री, मदतनीस चैताली तळवडेकर, शशांक चव्हाण, आदी कर्मचारी उपस्थित होते.