कुडाळ प्रांताधिकाऱ्यांकडून पोलीस पाटील नियुक्त्या पूर्ण मात्र कणकवली प्रांताधिकाऱ्यांचा वेळकाढूपणा
भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांचा वेळकाढूपणा केला अधोरेखित
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील निवड झालेल्या सर्व उमेदवारांना पोलीस पाटील पदी नियुक्ती द्यावी अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. मध्यंतरी निवडणूक आचारसंहिते मुळे पोलीस पाटील नियुक्ती रखडली होती. आता शैक्षणिक व अन्य कामांसाठी पोलीस पाटील दाखल्याची गरज भासते. तसेच प्रशासकीय कामेही करताना अडचणी येतात. कणकवली तालुक्यात पोलीस पाटील पड भरती राबविण्यात आली असून निवड यादी जाहीर करून नियुक्ती बाकी आहे. कुडाळ प्रांताधिकाऱ्यांनी मागाहून पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबवून याआधी पोलीस पाटील नियुक्त्या केल्या आहेत. सध्या कुठलीही निवडणूक नसून आचारसंहिताही नाही आहे. मात्र याबाबत कणकवली प्रांत कार्यालयाकडून अद्याप कार्यवाही करण्यात आलेली नाही. यावेळी कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम, हरकुळ खुर्द उपसरपंच सर्वेश दळवी, कळसुली सरपंच सचिन पारधिये, सुभाष मालंडकर, नयन दळवी, अभय गावकर, प्रज्ञेश राणे आदी उपस्थित होते.