शिक्षण ही एकांगी प्रक्रिया नाही, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या संघटीत सहकार्यातून शिक्षण प्रवाही राहते – मुख्याध्यापक सुनिल घस्ती

देवगड (प्रतिनिधी) : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या पालक शिक्षक संघाची कार्यकारिणी निवड सभा देवगड येथील अनंत कृष्ण केळकर हायस्कूल वाडा येथे प्रशालेच्या सभागृहात नुकतीच शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठीची पालक शिक्षक संघाची कार्यकारिणी सभेमध्ये निवडण्यात आली.

यावेळी मंचावर सभेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक सुनिल घस्ती, पालक शिक्षक संघाचे माजी उपाध्यक्ष श्रीनिवास मराठे, वेलणकर, सहा. शिक्षक विकास पवार व आकाश तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. सभेला सुमारे १०० पालक उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य शासनच्या शासन निर्णयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रशालेमध्ये पालक शिक्षक संघाची स्थापना करणे अनिवार्य असते, त्याचप्रमाणे माता पालक संघ ही सुद्धा समिती गठीत करणे आवश्यक असते. याच अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी पालक शिक्षक संघाची व माता पालक संघाची स्थापना सभेमध्ये करण्यात आली. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार इयता निहाय व गावनिहाय पालक प्रतिनिधी निवडण्यात आले. प्रवीण बिर्जे यांची पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अध्यक्षीय मनोगतात घस्ती यांनी शाळेच्या गतवर्षीच्या विविध उपक्रमांचा आढावा घेत भविष्यातही येऊ घातलेल्या विविध स्पर्धा, परीक्षा, उपक्रम यांची माहिती सभेला दिली. त्याचप्रमाणे पालक शिक्षक संघाचे महत्त्व विशद करताना शिक्षण ही एकांगी प्रक्रिया नसून शिक्षक व विद्यार्थी यांच्यासोबतच पालकसुद्धा महत्त्वाचा घटक असल्याचे प्रतिपादन केले.

यासभेवेळी ‘योजनांचा जागर’ हा अभिनव उपक्रमही राबवण्यात आला. यामध्ये प्रशालेचे सहा. शिक्षक आकाश तांबे यांनी शासनामार्फत वि‌द्यार्थ्यांसाठी असणा-या विविध शिष्यवृत्ती, परीक्षा यांची माहिती उपस्थित पालकांना दिली.

या सभेचे सूत्रसंचालन सहा. शिक्षक आकाश तांबे यांनी केले. गतवर्षीच्या पालक सभेच्या अहवालाचे वाचन सहा. शिक्षिका स्मिता तेली यांनी केले. सभेचे प्रास्ताविक सहा. शिक्षक विकास पवार तर आभार प्रदर्शन भूषण दातार यांनी केले.

शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ पालक शिक्षक संघ कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-
अध्यक्ष सुनिल दिनकर घस्ती उपाध्यक्ष प्रवीण सदानंद बिर्जे, कार्यवाह उत्तरेश्वर रामलिंग लाड, सहकार्यवाह चारुदत्त नारायण मराठे, सदस्य पदी प्रसाद तावडे, महेश गुरव, रमा जोशी, एकनाथ पुजारे, मिलिंद वारीक, प्राप्ती पुजारे, प्रतीक्षा केळकर, मनीष चौघुले, समीर परकर, उत्कर्षा जाधव सूर्यकांत फणसेकर,सुचिता गावकर ,जितेंद्र मोंडकर, रूचिता पुरळकर, विजय मुळम, आदिती घारकर, मधुरा मराठे, सत्यवान आमलोसकर, संतोष कानडे, तर माता पालक कार्यकारणी पदी अध्यक्ष सुनिल दिनकर घस्ती (मुख्याध्यापक), उपाध्यक्षा चंदना चंद्रशेखर जाधव, कार्यवाह, प्रीती नवनाथ चौगुले, सहकार्यवाह – जिया जितेंद्र जाधव, सदस्या, प्रणया प्रदीप घाडी, सुजाता जयवंत शिदे, सिमरन रमण प्रळकर, जान्हवी दिपेश जाधव, प्रिती संतोष तावडे यांची निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!