‘वारी साक्षरतेची’ हा ऑनलाईन प्रसारित कार्यक्रम विद्यार्थी -शिक्षक,पालक यांनी पहावा- शिक्षणाधिकारी प्रदिप कुमार कुडाळकर यांचे आवाहन
दुपारी १.३० वाजता https://youtu.be/qnA54W_5FDM या यु ट्युब लिंक द्वारे प्रसारित केला जाणार
वैभववाडी (मंदार चोरगे) : आषाढी एकादशीनिमित्त ‘वारी साक्षरतेची’ या उपक्रमांतर्गत दिनांक १७ जुलै २०२४ रोजी दुपारी ०१.३० वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शाळांतील कलाशिक्षक व विद्यार्थी यांनी सादर केलेली नाटिका, पटनाट्य, स्वरचित गित असा एकत्रित कार्यक्रम आज दुपारी ०१.३० ते ०३.३० या वेळेत https://youtu.be/qnA54W_5FDM या यु ट्युब लिंक द्वारे प्रसारित केला जाणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी पालक यांनी हा कार्यक्रम आवर्जून पहावा असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर यांनी केले आहे.
या कार्यक्रमात वामनराव महाडिक विद्यालय तळेरे, शिवाजी इंग्लिश स्कूल, पणदूर. कोलेगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आरोंदा हायस्कूल आरोंदा या शाळा व जिल्ह्यातील सर्व कलाशिक्षक सहभागी झाले आहेत.













