राधानगरी धरण 60 टक्के भरलेजिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण 42.4 मिमी पाऊस

गगनबावडा येथे 96.9 मिमी पाऊस

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ . राधानगरी धरणात पाण्याची
क्षमता वाढत आहे. धरणात सध्या 5.08 टीएमसी इतका पाणीसाठा असून धरण 60.81 टक्के भरले आहे. कोयना धरण 44.07 टीएमसी असून धरण 41.87टक्के भरले आहे. आज सकाळी 12 वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी 23 फूट 5 इंच इतकी होती.

जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 96.9 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 24.1 मिमी, शिरोळ -12.6 मिमी, पन्हाळा- 49.3 मिमी, शाहुवाडी- 75 मिमी, राधानगरी- 59.5 मिमी, गगनबावडा- 96.9 मिमी, करवीर- 29.3 मिमी, कागल- 39.7 मिमी, गडहिंग्लज- 31.1 मिमी, भुदरगड- 63.5 मिमी, आजरा- 43.8 मिमी, चंदगड- 47.3 मिमी असा एकूण 42.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

error: Content is protected !!