दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा
जीवन विद्या मिशन तर्फे श्री. सद्गुरू वामनराव पै हरिपाठ (मालवण)
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब च्या वतीने आषाढी एकादशी निमित्त येथे पळसंब जयंती देवी मंदिर येथे दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.
जीवन विद्या मिशन तर्फे श्री. सद्गुरू वामनराव पै हरिपाठ (मालवण) यांचा कार्यक्रमही यावेळी सादर झाला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे आजीव सभासद डॉक्टर सुरेश भोगटे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दहावी बारावी मुलांचा प्रमाणपत्र, वह्या, पेन मंडळाच्या वतीने देण्यात आले. त्यावेळी डॉ भोगटे यांनी बोलताना मुलांनी गुणवत्तेत या आणि पळसंब गावाचे नाव रोशन करा व मंडळ अनेक यशस्वी आणि गावाच्या हिताचे उपक्रम राबवत आहे त्यांना पाठबळ देण्यासाठी प्रत्येकाने मंडळाचे सभासद नोंदणी करा व मंडळाचे हात बळकट करा असे आवाहन त्यांनी केले.
त्यानंतर जीवन विद्या मिशन तर्फे श्री सद्गुरु वामनराव पै हरिपाठ कार्यक्रम करण्यात आला. त्यावेळी सौ. ज्ञानज्योती बिनसाळे, वैशाली नलावडे, सुमंगल परब, संभाजी बिनसाळे, वामन आचरेकर, सुदर परब, संकेत नलावडे यां सर्वांनी उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, आषाढी एकादशीच्या सर्वांना
शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यानंतर मंडळाच्यावतीने प्रमुख उपस्थितीताचा सत्कार करण्यात आला त्यानंतर जयंती देवी प्रासादिक भजन मंडळाने भजनी बुवा अनिल परब यांनी सुंदर भजनाचे सादरीकरण केले त्यावेळी देवस्थात मानकरी राजन पुजारे, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष श्री. रमेश परब मंडळाचे अध्यक्ष उल्हास सावंत, उपाध्यक्ष अमरेश पुजारे, सचिव चंद्रकांत गोलतकर, शेखर पुजारे, हितेश सावंत, अमित पुजारे, प्रमोद सावंत, रामकृष्ण पुजारे, मेघशाम जुवेकर, प्रमोद पुजारे, अनिल साटम, बाळा पुजारे, जीजी सावंत, पपु सावंत, बबन पुजारे, शोभा पुजारे, मनोरमा पुजारे, हर्षदा सावंत, पल्लवी सावंत, रचना पुजारे, पूनम गोलतकर, आरती परब, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाच्यावतीने अध्यक्ष उल्हास सावंत यांनी आभार व्यक्त केले.