सुविद्या इन्स्टूट्यूड ऑफ टेक्नोलॉजी मुंबई कडून वसंत मेस्त्री यांच्या संकल्पनेतून दिली जाते शिष्यवृत्ती
उद्योजक प्रकाश मेस्त्री यांनी वायंगणी सरपंच रुपेश पाटकर यांच्या उपस्थितीत प्रदान केला धनादेश
आचरा (प्रतिनिधी) : ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी हायस्कूला मार्च 2024 मध्ये दहावी इयत्तेत प्रथम आलेल्या कु. युवराज रमेश साळकर याला आज शिक्षण तज्ञ कै. वसंत दिनकर मेस्त्री यांच्या संकल्पनेतून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचा धनादेश उद्योजक प्रकाश मेस्त्री यांच्या हस्ते ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी मध्ये प्रदान करण्यात आला.
गेली तीन वर्षे सुविद्या इन्स्टूट्यूड ऑफ टेक्नोलॉजी मुंबई कडून शिक्षण तज्ञ कै. वसंत दिनकर मेस्त्री यांच्या संकल्पनेतून हि शिष्यवृत्ती प्रकाश मेस्त्री कुटुंबियांन कडून दिली जाते. यावेळी मुख्याध्यापक दगडू टकले, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर, शिक्षक आडे, वसावे आदी उपस्थित होते.