आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाने प्रेरित होत भाजपाचे कमळ घेतले हाती
देवगड (प्रतिनिधी) : देवगड जामसंडे नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष मिताली सावंत ह्या पूर्वीच भाजपाच्या गटामध्ये सामील झाल्या होत्या. त्यांनी देवगड जामसंडे नगरपंचायतीमध्ये भाजपाला पाठिंबा दिला होता. मात्र त्या राष्ट्रवादीतच होत्या. आज त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केला.
गेले दोन अडीच वर्षात शिवसेनेची सत्ता असून देवगड जामसंडे नगरवासियांना विकास पाहता आला नाही. याशिवाय कचरा, आरोग्य, स्ट्रीट लाईट, रस्ते व अन्य विकास कामे यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले. देवगड जामसांडे नगरपंचायतीचा विकास व्हायचा असेल तर आमदार नितेश राणे हाच शेवटचा पर्याय आहे.
यामुळे आमदार नितेश राणे यांच्यावर विश्वास ठेवून उपाध्यक्ष मिताली सावंत यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत विजय कदम, आनंद देवगडकर राजेश सावंत यावेळी उपस्थित होते.