मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडीत निबंध स्पर्धा संपन्न

निबंध स्पर्धेला विद्यार्थीनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वैभववाडी (प्रतिनिधी) : मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त वैभववाडी तालुका स्तरावर इयत्ता पाचवी ते आठवी व इयत्ता नववी ते बारावी अशा दोन गटात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मला सैनिक व्हायचंय..! जय जवान..जय किसान..! मेजर कौस्तुभ रावराणे. हे विषय लहान गटांसाठी तर माझा देश माझी जबाबदारी, शहिद मेजर कौस्तुभ राणे, भारतीय सैन्यदल सक्षमीकरण काळाची गरज हे विषय मोठ्या गटांसाठी देण्यात आले होते. लहान गटांसाठी शब्द मर्यादा २०० तर मोठ्या गटांसाठी शब्द मर्यादा ५०० ठेवण्यात आली होती.

अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल,कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात सदर निबंध स्पर्धा आज पार पडली प्रशालेच्या सांस्कृतिक विभागातर्फे या स्पर्धेचे नियोजन प्रशालेत करण्यात आले होते. सदर स्पर्धेला विद्यार्थीनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

error: Content is protected !!