महसूल पंधरवडा उपक्रमांतर्गत मालवण तालुक्यात कृषी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

चौके (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन महसूल विभागामार्फत 1ऑगस्ट 2024 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधी मध्ये महसूल पंधरवडा साजरा करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाअंतर्गत मालवण तालुक्यात ठिकठिकाणी कृषी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आला आहे दरम्यान सोमवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी तालुक्यातील पोईप (ग्रा.प. हाॅल), कट्टा ( मामा माडये हाॅल), आचरा (प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा नजिक) या ठिकाणी कृषी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. दरम्यान माडये हॉल कट्टा येथे पार पडलेल्या कृषी मार्गदर्शन शिबीरास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे, मंडळ कृषी अधिकारी एस. जी. परब, मंडळ अधिकारी महादेव गवस, शिंग्रे, कृषी सहाय्यक पवनकुमार सौंगडे, गोळवण सरपंच सुभाष लाड, सामाजिक कार्यकर्ते जयंद्रथ परब, राजन माणगावकर, आदि मान्यवर तसेच कट्टा पंचक्रोशीतील तलाठी, कोतवाल आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी महसूल पंधरवडा विषयक मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी एस. जी. परब यांनी कृषीविषयक मार्गदर्शन करून विविध योजनांची माहिती दिली. मंडळ अधिकारी पेंडूर महादेव गवस यांनी ई – हक्क फेरफार अर्ज प्रणाली विषयक मार्गदर्शन केले, तर आंबेरी मंडळ अधिकारी शिंग्रे यांनी ई – पिक पहाणी नोंद विषयक मार्गदर्शन केले. याबरोबरच शेतकऱ्यांना शेती विषयक कामे, बी बियाणे, खते, पीक संरक्षण, पशुसंवर्धन, धान्य साठवण याबाबत माहीती व मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, प्रास्ताविक, आभार ॲड. प्रदिप मिठबावकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!