कणकवली (प्रतिनिधी) : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या आदेशान्वये एकदिवसीय धरणे आंदोलन सिंधुदुर्ग नगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालया समोर कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्ष समाजभूषण संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने संपूर्ण राज्यभर एकाच वेळी धरणे आंदोलन करण्यात आले. सदर धरणे आंदोलणात संदीप कदम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णयाचे दिनांक 7 मे 2021 अन्वये महाराष्ट्रातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती पासून वंचित ठेवले आहे. सर्व प्रवर्गातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती व सरळ सेवा भरती मध्ये दिलेल्या सवलतीस अनुसरून माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्णय व मार्गदर्शन देशातील सर्व राज्यावर सोपविले आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची व मार्गदर्शनाची केंद्र सरकारने अंमलबजावणी करून देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या माननीय मुख्यसचिव यांना दिनांक 15 जून 2018 रोजीच्या परिपत्रकाद्वारे कळविले आहे की, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या रोखता येणार नाहीत परंतु असे स्पष्ट निर्देश देऊनही महाराष्ट्र शासनाने अद्यापही मागासवर्गीयांच्या पदोन्नत्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. कर्नाटक राज्य शासनाने मा सर्वोच्च न्यायालयाच्या धर्तीवर मागासवर्गिय कर्मचारी यांना पदोन्नत्या दिल्या आहेत. मात्र महाराष्ट्र राज्यातील सर्व मागासवर्गीय कर्मचारी हे पदोन्नतीच्या न्याय हक्कापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाप्रती कर्मचाऱ्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे.
त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना इतर राज्यांप्रमाणे लागू करावी. तसेच पदोन्नती प्रमाणे सरळ सेवेतही मागासवर्गीयांच्या अनुषेशाची पदे मोठ्या प्रमाणावरील आहेत सदरचे पदे ही प्राधान्याने भरण्यात यावीत. सरकारी नोकर भरतीतील कंत्राटीकरण रद्द करणे, महाराष्ट्र शासनाने 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे, शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना 10/ 20/ 30 चालू करावी, सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन संरचना सुरक्षित करणे, अनुकंपा भरती पूर्ववत चालू करणे तसेच अन्य मागण्यांबाबत चे निवेदन निवासी जिल्हाधिकारी महेन्द्र सुकटे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्या ना पाठवण्यात येत असल्याचे संदीप कदम यांनी सांगितले. यावेळी वेगवेगळ्या मागण्याच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यां संदर्भात घोषणांनी जिल्हाधिकारी परिषद परिसर दुमदुमून निघाला होता.
या वेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महासचिव किशोर कदम, प्राथमिक संघटना जिल्हाध्यक्ष विकास वाडीकर, माध्यमिक संघटना जिल्हाध्यक्ष संजय पेंडुरकर, महासचिव अभिजीत जाधव, आरोग्य संघटना उपाध्यक्ष महेंद्र कदम, महासचिव अविनाश धुमाळे, आरोग्य संघटना उपाध्यक्ष दीपक कांबळे, माध्यमिक संघटना उपाध्यक्ष संदीप नागभिडकर, प्राथमिक संघटना ज्येष्ठ नेते अजित तांबे, सूर्यकांत साळुंखे, विद्यानंद शिरगावकर, प्राथमिक संघटना महासचिव मनोज आटक, सफाई कामगार संघटना जिल्हाध्यक्ष अविनाश तांबे, ऋषिकेश तांबे, सुभाष जाधव, दयानंद तांबे, वाहन चालक संघटना जिल्हाध्यक्ष संतोष कदम यांचे जे एस फर्नांडिस मुख्यसेविका कास्ट्राईब संघटना जिल्हाध्यक्षा उल्का खोत, महासचिव लीना कडुलकर, ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष मंगेश साळसकर, महासचिव प्रशांत जाधव, लाडू जाधव, अजित कुमार देठे, मुख्याध्यापक किशोर यादव, बिपिन ठाकूर, प्रणय तांबे, सुरेंद्र यादव, संदेश कदम, आरोग्य संघटना संघटक सुधीर धामणकर, प्राथमिक संघटना माजी जिल्हाध्यक्ष अमित ठाकूर सूर्यकांत खरात, अनंत बिडये आदीप्रमुख कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते शेवटी आभार संजय पेंडुरकर यांनी व्यक्त केले