सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कणकवली कॉलजचे नेत्रदिपक यश

कणकवली (प्रतिनिधी) : येथील कणकवली महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये विविध खेळ प्रकारामध्ये १९ वर्षाखालील मुले व मुलींनी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. या मध्ये कुस्ती, फेन्सिंग, इपी, सेबर, फॉइल, जलतरण, बॅडमिंटन, तेनिकॉइड या स्पर्धेमध्ये मिळवलेल्या यशामुळे विद्यार्थ्यांची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामध्ये तन्वी पारकर (कुस्ती), मीरा नवरे (जलतरण), यशिक महाडेश्वर (फॉइल), प्रचिती घाडीगांवकर (मल्लखांब) सदर विद्यार्थ्यांनी ची निवड कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी झालेले आहे.

जिल्हास्तरीय निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक जे. बी. कसालकर यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू , सर्व संस्था पदाधिकारी, प्राचार्य युवराज महालिंगे, प्र.पर्यवेक्षक महादेव माने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!