कळसुली तंटामुक्त समिती अध्यक्षपदी अरुण दळवी यांची बहुमताने निवड

तंटामुक्त समिती अध्यक्षपद निवडीत स्वयंघोषित पुढारी प्रस्थापितांना धक्का

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कळसुली गावाच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी अरुण बाबी दळवी यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या दोन्ही उमेदवाराना अनुक्रमे 20 आणि 1 अशी मते मिळली. तंटामुक्त समिती अध्यक्षपद निवडीसाठी तहकूब झालेली सभा आज कळसुली ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आली. यावेळी एकमत न झाल्याने तंटामुक्त समिती अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार इच्छुक राहिले. उपस्थित ग्रामस्थांनी मतदान करून बहुमताने अरुण दळवी यांना तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवडून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!