पितृपक्षात दिविजा वृद्धाश्रमात एका दिवसाचे अन्नदान करून पितृपक्ष साजरा करा

कणकवली (प्रतिनिधी) : पितृपक्ष म्हटल्यावर आपल्या पूर्वजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अन्नदान केले जाते.विशेषतः पूर्वजांच्या, वाडवडिलांच्या तिथीला कोकणात महालय म्हणजेच म्हाळ घातला जातो. पितृपक्षात दिविजा वृद्धाश्रमातील अनाथ वृद्धांना एका दिवसाचे अन्नदान करून पितृपक्ष नव्या पद्धतीने साजरा करून वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या चेंजऱ्यावर आनंद आणावा असे आवाहन कणकवली तालुक्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमाचे संदेश शेट्ये यांनी केले आहे. यासाठी वर दिलेल्या स्कॅनर वर स्कॅन करून दाते अन्नदान करू शकता अथवा थेट दिविजा वृद्धाश्रमात मोबाईल क्रमांक 9223221400 यावर संपर्क साधू शकता. आपल्या पितृजनांचे श्राद्ध पितृपक्षात करण्याची हिंदू संस्कृतीत परंपरा आहे. आजच्या धावत्या जीवनात प्रत्येकास आपल्या आप्त जनाचे श्राद्ध मनात असतानाही करणे शक्य होत नाही. अश्या वेळेस आपल्या पितृजनांचे स्मरण आपण दिविजा वृद्धाश्रमातील गरजू व गरजवंत आजी-आजोबांना एका दिवसाचे अन्नदान करूया.

भरलेल्या पोटाला अन्नदान करण्यापेक्षा गरजवंताला अन्नदान करणे यापेक्षा अन्य पुण्य असू शकत नाही.चला तर नव्या पद्धतीने पितृपंधरवडा पितृजनाच्या आठवणीचा जागर करूया.पितृपक्षात केलेले दान हे थेट पितरांना पिंडदानच्या स्वरुपात स्वर्गात पोहचले असे मानले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!