फोंडाघाट वाडीवाडी वर उगवाई पात्रात मोरयाचे उत्साहात विसर्जन !
उगवाई गणपती सान्यावरील पक्का मंडप,लाईट व्यवस्था, स्वच्छ्ता,तसेच पोलीस बंदोबस्त याबद्दल उपस्थितांकडून संबंधितांचे कौतुक
फोंडाघाट (प्रतिनिधी) : अनंत चतुर्दशीच्या घरोघरी दुपारच्या महाप्रसादा नंतर उत्तरपूजा करण्यात आली. आणि मिरवणुकीतून गणरायाची स्वारी परतीच्या प्रवासाला निघाली. यामध्ये नवी कुरली वसाहतीतील गणपती वैयक्तिक वाहनाने उगवाई गणपती सान्या वर संध्याकाळी येऊ लागले. हवेलीनगर मधील वाहनांवर स्पीकर द्वारे गणपतीची गाणी -भजने आणि त्यामध्ये घरोघरी गणपती स्थानापन्न झाले. फटाक्यांच्या आतशबाजी आणि गणपतीच्या जयs जयss कारात रस्त्याच्या एका बाजूने अबालवृद्ध, युवा- युवती मार्गस्थ झाली. एसटी स्टँडवर येतात फोंडाघाट बाजारपेठेतील गणपती वाहनांमधून विसर्जन स्थळी रवाना झाले. फटाक्यांची अमर्याद आतषबाजी आणि मोरयाs मोरयाss च्या जयघोषाने बाजारपेठ दुमदुमली.
सुमारे तीन-चार तास ही मिरवणूक रस्त्याच्या एका बाजूने सुरू होती. स्थानिक व पोलीस कॉन्स्टेबल वंजारे, माने आणि सहकारी होमगार्ड स्टाफ यांनी वाहतुकीची चोख व्यवस्था केल्याने, सदैव वाहतूक खंडित असणारी फोंडाघाट बाजारपेठ मध्ये वाहतूक सुरळीत होती. याबद्दल ग्रामस्थ- भाविकांनी पोलिसांबद्दल कौतुकोत्गार काढले..
सात वाजता ग्रामपंचायतीसमोरील “उगवाई गणपती साना” वर मिरवणूक पोहोचताच, ग्रामपंचायतीने नुकत्याच उभारलेल्या मंडपात गणपती एका ओळीमध्ये उतरवण्यात आले. उगवाई गणपती सान्यावरील नूतन मंडप, साफसफाई,नदीपात्रात पाणी साठवणूक आणि लाईट व्यवस्था सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरले. त्यामुळे विद्यमान सरपंच, सहकारी सदस्य आणि कामगार यांचे बद्दल भाविकांमधून समाधान व्यक्त होते. मात्र डावीकडील घळण आणि रेलिंग आवश्यक होते. सामुदायिक आरतीने समोरील सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि उगवाई नदीपात्र निनादले. गणरायाला प्रार्थना आणि पुढच्या वर्षी लवकर या तसेच सर्वांना सुबुद्धी द्या च्या गाऱ्हाण्याने सर्वांचे डोळे पाणवले. त्यानंतर जयजय करत करत एका एका गणपतीला नदीपात्रात नेऊन भक्तिमय निरोप देण्यात आला. प्रत्येक गणराया सोबत भाविकांनी घरून आणलेल्या प्रसादाचे पारंपारिक पद्धतीने एकत्रीकरण करून सर्वांना तो “विघ्नेश्वराचा निरोपाचा प्रसाद” वाटप पटेल कुटुंबीयांकडून करण्यात आले. आणि जड अंतकरणाने ग्रामस्थ, अबालवृद्ध, युवाईचे पाय आपापल्या घराकडे वळू लागले.
या उगवाई गणपती सान्यावर मारुतीवाडी,बिजलीनगर इत्यादी ठिकाणच्या घरगुती गणपतीचे ही विसर्जन उत्साहात करण्यात आले. मारुतीवाडी चा ड्रेसकोड-महिलांच्या फुगड्या- पारंपारिक नाच आणि पुरुषांबरोबर भजनाची साथ तसेच युवा युवतींचा शिस्तबद्ध सहभाग, ढोल पथकाची ललकारी यामुळे ही विसर्जन मिरवणूक आदर्शवत ठरली.