महिलांची वक्तृत्व स्पर्धा व काव्यगायन स्पर्धेमुळे कार्यक्रमात आली अनोखी रंगत
कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिलादिनाचे औचित्य साधत पूर्ण प्राथमिक शाळा माईण नं. १ येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध मनोरंजात्मक खेळांसोबतच ‘जन्म बाईचा’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धा आणि ‘आपल्या शालेय जीवनातील एक कविता गायन’ अशी काव्यगायन स्पर्धा हा सर्वांसाठी औत्सुक्याचा विषय होता.
कधीही समोर येऊन न बोलणाऱ्या गृहिणी, कष्टकरी, शेतकरी असणाऱ्या या महिलांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या सुंदर काव्यगायनाला उपस्थितांची भरभरून दाद मिळाली. वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने प्रथमच स्वतः विषयी व्यक्त होणाऱ्या या महिलांनी बाई म्हणून आपल्या जगण्याला असलेले अनेक कंगोरे मोकळेपणाने व्यक्त केले. प्रत्येकीची वेगवेगळी कहाणी त्यांच्याच तोंडून ऐकताना सारं वातावरण भावविवश झाले होते.
मनोरंजनात्मक खेळांमध्ये सुद्धा महिलानी बहुसंख्येने सहभागी होत खेळांचा पुरेपूर आनंद लुटला.
विविध स्पर्धांचा निकाल –
१. वक्तृत्व स्पर्धा – रसिका घाडीगांवकर
प्रज्ञा मेस्त्री
दीक्षा बाईत
२. कविता गायन – दीक्षा बाईत
प्रज्ञा मेस्त्री
वृंदा दहीबावकर
३. पोत्यातील उड्या – वृषाली पाडावे
समीक्षा आडेलकर
रसिका घाडीगांवकर
४. गाढवाला शेपूट लावणे – रसिका घाडीगांवकर
सलोनी परब
दीक्षा बाईत
५. संगीत खुर्ची – प्रज्ञा मेस्त्री
अदिती गावकर
रंजीता घाडीगांवकर
अत्यंत उत्साहात आणि महिलांच्या बहुसंख्येच्या उपस्थितीत पार पडलेल्या सोहळ्यात प्रशालेच्या मुख्याध्यापिका दीपा काकतकर यांनी यथोचित मार्गदर्शन केले. प्रास्ताविक पदवीधर शिक्षिका प्रतीक्षा तावडे यांनी केले. तर पदवीधर शिक्षिका राधिका सावंत आणि सहाय्यक शिक्षिका योगिता माळी यांनीही आपले विचार मांडले.
आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका ऋजुता चव्हाण यांनी केले.