मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील ११ रस्त्यांच्या कामांना मंजुरी
कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत कुडाळ तालुक्यातील ११ रस्त्यांच्या कामांना मंजुरी देऊन प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी एकूण ३२ कोटी ५० लाख रु. निधी मंजूर करण्यात आले आहेत.
त्यामध्ये कुंदे कदमवाडी नाटेकरवाडी आंब्रड परबवाडी रस्ता (ग्रा.मा.-९५ व ८९) ४.४७५ किमीसाठी ४ कोटी ३९ लाख, घावनळे रामेश्वर मंदिर खुटवळवाडी रस्ता ( ग्रा.मा.-२४५ ) ३.७०० किमीसाठी ३ कोटी ५२ लाख, हिर्लोक हातेरी रांगणा तुळसुली रस्ता ( ग्रा.मा.- २५१) २.७५० किमीसाठी २ कोटी ९० लाख, पुळास बाबरवाडी दुकानवाड रस्ता ( ग्रा.मा.-२०८) ४.८०० कमीसाठी ४ कोटी ६२ लाख, घोडगे सोनवडे पवारवाडी लाडवाडी रस्ता ( ग्रा.मा.-९) ४ किमीसाठी ३ कोटी ९५ लाख, एनएच -६६ ते बिबवणे मांगलेवाडी रस्ता ( ग्रा.मा.-४०७) ३.५०० किमीसाठी २ कोटी ८९ लाख, एसएच -१९१ ते नारूर महालक्ष्मी मंदिर रस्ता ( ग्रा.मा.-२२२) १.८०० किमीसाठी १ कोटी ५४ लाख, नेरूर वाघोसेवाडी रस्ता ( ग्रा.मा.-३५६) ३ किमीसाठी २ कोटी ३९ लाख, नेरूर देसाईवाडी शिरसोंडवाडी रस्ता ( ग्रा.मा.-३६२ & ३६३ ) ३.२९० किमीसाठी २ कोटी ७३ लाख, तेंडोली आदोसेवाडी मुणगी रस्ता ( ग्रा.मा.-३७८ & ३८४) ३.५०० किमीसाठी २ कोटी ७९ लाख, रानबांबुळी वायंगणकरवाडी रेल्वे स्टेशन रस्ता ( ग्रा.मा.-११२) १.६०० किमीसाठी १ कोटी ५९ लाख हि कामे मंजूर झाली असून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय १० मार्च २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.