कु. मनोहर घाडी-प्रथम, सोहम चिंदरकर-व्दितीय, भूषण पाताडे-तृतीय तर अक्षया गांवकर-चतुर्थ
आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2023 घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत(SSC) जनता विद्या मंदिर त्रिंबक हायस्कूलच्या परीक्षेला बसलेल्या 29 पैकी 29 विद्यार्थी उत्तिर्ण होत 100 नंबरी यश प्राप्त केले आहे. चार वर्षे यशाची परंपराही कायम राखली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनमध्ये कु. मनोहर सूर्यकांत घाडीगावकर 90.80% गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक, कु. सोहम महेंद्र चिंदरकर 87.20 गुण प्राप्त करत व्दितीय क्रमांक, कु. भूषण रविकांत पाताडे 84. 60 गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक, कुमारी अक्षया मंगेश गावकर 80.00गुण प्राप्त करत चतुर्थ क्रमांक व कुमारी कोमल श्रीकांत बागवे 77.80 गुण प्राप्त करत पाचवा क्रमांक मिळवला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष सुरेंद्र सकपाळ, मुख्याध्यापक प्रविण घाडीगांवकर, एकनाथ गायकवाड, महेंद्र वारंग, धुरे, गोसावी, मेंहेदळे सहकारी शिक्षक व संस्था कार्यकारीणी यांचे मार्गदर्शन लाभले.













