पियाळी येथे 100 झाडांचे वृक्षारोपण

कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय फोंडाघाट येथे चतुर्थ वर्ष पदवी मधे शिकणाऱ्या कृषि दुतांचे पियाळी येथे आगमन झाले आहे . या कार्यक्रमांतर्गत पियाळी गावातील शेतकऱ्यांना शेतीतील नवीन तंत्रज्ञान पीक पद्धती व मृदा आरोग्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत . या कृषि दुतांच्या अभ्यासाचा गावातील ग्रामस्थांना फायदा होणार आहे . ऋषिकेश बाबर ,प्रथमेश नागरगोजे , विश्र्वतेज पाटील ,आदित्य माळी, करण पाटील ,तिरुमला रॉय , कोप्पू केशवा ,दिलीप कुमार हे कृषीदूत मोफत कृषी प्रात्यक्षिक देणार आहेत. पियाळी गावात 100 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी पियाळी सरपंच प्रवीण पन्हाळकर ,उपसरपंच संजय धवन ,तंटामुक्त अध्यक्ष संजय तांबे , पोलीस पाटील सुनील पवार ,ग्रामसेवक संगीता पाटील ,ग्रामपंचायत सदस्य विजय मुरकर ,कृषि सेवक निलेश कावले ,तलाठी गोडे केंद्र प्रमुख ओरवकर ,मुख्याध्यापक धीरज हुंबे व सर्व शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!