खारेपाटण (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर आचार संहिता लागू करण्यात आली असून मतदारांना आपला हक्क व अधिकार याची जाणीव करून देण्यासाठी तसेच निर्भयपणे मतदान करण्यासाठी आज मंगळवार
दि. १९ मार्च २०२४ रोजी सकाळी १०.०० खारेपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या वतीने खारेपाटण बाजारपेठेत मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली.
जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं. १ ते खारेपाटण बाजारपेठ मार्गे खारेपाटण एस टी बसस्थानक पर्यंत काढण्यात आलेल्या या मतदान जनजागृती फेरीत खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदिप श्रावणकर सर शाळेच्या शिक्षिका अलका मोरे, आरती जेजोंन, अमृता ब्रम्हदंडे, अबिदा नाईक यांसह शालेय विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत नागरिकांनामध्ये व मतदाराध्ये जनजागृती केली.
खारेपाटण बाजारपेठे मधून काढण्यात आलेल्या या शिस्तबध्द मतदान जनजागृती फेरीत शालेय विद्यार्थ्यांच्या मतदानाशी सलग्न असलेल्या घोषवाक्याचे फलक शालेय मुलांच्या हातात देण्यात आले होते. तर हे फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.
















