वादी प्रतिवादींची कागदपत्रे मिळण्यास होतो विलंब

अशा प्रकरणात जमिनीचे सबळ पुरावे देण्यास पुरेसा वेळ द्यावा

जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी

ओरोस (प्रतिनिधी) : जमीन हस्तांतरण आणि त्याचे अधिकार व वारसदार याबाबतचे निर्णय देताना वादी आणि प्रतिवादी यांना सोयीच्या तारखा देणे गरजेचे आहे. या तारखा जलद गतीने घेतल्यास वादी आणि प्रतिवादी यांना आवश्यक ती कागदपत्रे मिळणे शक्य नाही महसुली न्यायाधिकरणात नमूद असलेल्या नियमानुसार एका तारखेपासून दुसऱ्या तारखेपर्यंत पंधरा दिवसाची वेळ अपेक्षित आहे तसे न करता दोन आणि चार दिवसात पुन्हा पुन्हा तारखा लावून वादी प्रतिवादी यांना तारखांना उपस्थित राहण्यास गैरसोय होईल अशा पद्धतीचे कामकाज केले जात आहे. हे कामकाज थांबले जावे आणि जमीन अधिकाराच्या न्यायनिवाड्यात जलद गतीने तारखा देऊ नयेत सोयीनुसार तारखा किंवा नियमानुसार तारखा दिला जाव्यात अशी मागणी जयप्रकाश कदम यांनी मंडळ अधिकारी एडगाव यांच्या कुंभवडे ता. वैभववाडी एका सुनावणी प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. जर सुनावणी घेण्याच्या नावाखाली २ ते ४ दिवसात जलद गतीने निकाल (न्यायनिर्णय) देण्याची प्रक्रिया सुरु आहे. हे मालकी हक्कांवर गदा आणुन हरकतदार यांचे नुकसान करणारे आहे. महसुली कागदपत्रे महसुली कार्यालयातच असतात परंतु ती सर्वसामान्य लोकांना १० ते १५ दिवसांनंतरच का मिळतात असा प्रश्न जयप्रकाश कदम यांनी मंडळ अधिकारी यांना विचारला असता भोये यांनी समाधानकारक उत्तर न देता सदरच्या सुनावण्यांच्या तारखा प्रशासन अप्पर जिल्हा अधिकारी श्री. सुकटे यांनी दिल्याचे सांगितले. असे जिल्हाधिकारी यांच्याकडे जयप्रकाश कदम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी जिल्हाधिकारी व निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देताना जयप्रकाश कदम यांनी अशी मागणी केली की कायदेशीर रित्या मंडळ अधिकारी यांच्याकडे चालू असलेली सुनावणी या हरकतदार यांच्या हक्कावर गदा येणार नाही असे जिल्हाधिकारी यांनी उचित आदेश काढावेत अशी मागणी निवेदनाद्वारे जयप्रकाश कदम यांनी केली

error: Content is protected !!