कणकवलीतील फुटपाथ अतिक्रमण धारकांच्या विळख्यात

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असलेल्या आणि बुद्धविहार कणकवलीच्या गेटसमोरील कित्येक वर्षे प्रलंबित असलेले संरक्षक भिंतीचे काम या महिन्यातच पूर्णत्वास गेले. स्मारकाच्या समोरील फुटपाथ हा हायवे प्राधिकरण यांच्या ताब्यात असून गेली कित्येक वर्ष या फुटपाथवर अनधिकृतरीत्या स्टॉलधारकांनी अतिक्रमण केलेले आहे. नगर पंचायत कणकवली च्या प्रशासनाकडे या स्टॉल अतिक्रमण धारकांना हटविणेबाबत मागणी करून देखील त्यांनी सदर स्टॉल आणि सदर फुटपाथ मोकळा केलेला नाही. त्यामुळे कणकवली बस स्टँड येथून बाजाराच्या दिशेने जात असताना या फुटपाथवर अतिक्रमण असल्याने पादचाऱ्यांना हायवेवरून जीव मुठीत धरून चालत जावे लागते. केवळ स्टॉलधारकांनी फुटपाथवर अतिक्रमण केले असे नव्हे तर रिक्षाचालकांनी अनधिकृतरित्या रिक्षा स्टँड स्थापन करून त्याचे बोर्ड देखील या परिसरात अनधिकृतरीत्या लावण्यात आलेले आहेत. कणकवली शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गामुळे कणकवली शहराला एक आर्थिक स्थैर्य लाभलेले आहे आणि त्यामुळे या शहरातील हायवेच्या कडेने असलेल्या फूटपाथचं सौंदर्य अबाधित ठेवणे आणि पादचाऱ्यांना फुटपाथ उपलब्ध करून देण्याची नगरपंचायती जबाबदारी आहे. मात्र याकडे संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. कणकवली शहराच्या फूटपाथवरील अतिक्रमण धारकांना राजकीय अभय असल्याने या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे.

कणकवली बस स्टँडच्या बाजूला असलेल्या ट्रॅव्हल्स थांब्यामुळे आणि कणकवली बसस्थानकामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये चाकरमानी मोठ्या संख्येने येत असतात. बस स्टँड वरून कणकवली मुख्य बाजाराच्या दिशेने जाताना त्यांना फूटपाथचा मोठा आधार असतो मात्र अतिक्रमण धारक स्टॉलधारकांनामुळे पादचाऱ्यांना सागारहदारीच्या रस्त्यावरून चालण्याशिवाय गत्यंतर नसते. भविष्यात त्यामुळे होणारे अपघाताची जबाबदारी नेमकी कोण घेणार? अतिक्रमण धारक स्टॉलधारक हायवे प्राधिकरण की नगरपंचायत कणकवली?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!