नांदगाव तिठा आठवडा बाजारात नांदगाव ते फोंडा रस्त्यावर चिरा वाहतूक मुळे नांदगाव दशक्रोशी तील ग्रामस्थ बाजाराच्या दिवशी हैरान
कणकवली (आनंद तांबे) : मे महिन्यात आणि इतर दिवशी रविवारच्या बाजाराच्या वेळी नांदगाव फोंडा या रस्त्यावर नांदगाव दशक्रोशी चा बाजार भरतो परंतु दर दिवशी जाणारे चिरा वाहतूक ही रविवारी सुद्धा या रस्त्याचा वापर करत असल्यामुळे रविवारी बाजारच्या दिवशी अरुंद रस्ता असल्याने दोन्ही बाजूचे ट्राफिक येणारी आणि जाणारी पूर्णपणे जाम होते आणि याचा त्रास नांदगाव दशक्रोशी बाजाराला येणाऱ्या ग्रामस्थांना फार मनस्ताप होतो.
तरी पोलीस प्रशासनाने सदर रविवारच्या बाजाराच्या दिवशी नांदगाव येथील या प्रश्नावर काहीतरी तोडगा काढावा असे सर्व ग्रामस्थांचे म्हणणे आहे.