वस्तू व सेवा कर विभाग – ओरस यांच्यावतीने पर्यावरण दिन साजरा ! ग्रामपंचायत पडवे हद्दीत वृक्षारोपण

प्रत्येकाने एक तरी झाड लावून जोपासावे आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा – डॉ .अभिजीत पोरे

फोंडाघाट (प्रतिनिधी) : वस्तू व सेवा कर विभाग – ओरस यांच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायत, पडवे हद्दीतील मोकळ्या जागी आणि रस्त्याच्या कडेला पर्यावरण पूरक झाडांची रोपे लावून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्य कर उपायुक्त, जीएसटी ऑफिस, ओरस चे डॉक्टर अभिजीत पोरे, ग्रामपंचायत पडवे चे सरपंच आनंद शंकर दामोदर आणि ग्रामपंचायत सदस्य व जीएसटी विभागातील अधिकारी व कर्मचारी इत्यादी उपस्थित होते. एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून, प्रत्येकाने एक तरी झाड लावून जोपासणे गरजेचे आहे. तरच आपले- आपल्या गावचे पर्यावरण समतोल राखले जाईल आणि पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. याची काळजी घ्यावी असे आवाहन डॉ. अभिजीत पोरे यांनी केले.

error: Content is protected !!