पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी बिलये कुटुंबाला केली रोख स्वरूपात आर्थिक मदत..!

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी वेंगुर्ले तालुक्यातील कोचरा येथील अपघातग्रस्त बिलये कटुंबाचे केले सांत्वन

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यातील कोचरा (रवळनाथवाडी) मधील मधुकर (बंटी) प्रदीप बिलये याचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. बंटी हा एकमेव घरातील कमवता व्यक्ती असल्यामुळे त्या कुटुंबावर आभाळच कोसळले.

सध्य स्थितीत त्याची आई, व वयस्कर आजी, छोटी बहीण असा परिवार आहे. उत्त्पन्नची कोणतीच बाजू नसल्यामुळे या कठीण प्रसंगात त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याच्या दृष्टीकोनातून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी रोख रक्कम जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे मार्फत त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द केली.

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी सभापती निलेश सामंत, माजी सभापती वंदना किनळेकर, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, शक्तिकेंद्र प्रमुख नाथा मडवळ, अनु. जाती मोर्चाचे गुरुप्रसाद चव्हाण, आपी फणसेकर, देवदत्त साळगांवकर, युवा मोर्चाचे विनीत किनळेकर तसेच कोचरे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!