वैभववाडी( प्रतिनिधी) : 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ , दापोली अंतर्गत उद्यान विद्या महाविद्यालय सांगुळवाडी येथील कृषी दुतांनी भुईबावडा येथे आदर्श विद्यामंदिर शाळेमध्ये शेतकरी जनजागृती रॅली व वृक्षारोपणाचे आयोजन केले.
या उपक्रमांतर्गत शेतकरी रॅलीमध्ये शेतकऱ्यांविषयी जनजागृती व विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे आयोजन उद्यानविद्या महाविद्यालयाचे कृषीदूत कृष्णात बामणे ,महेश भिसे ,ऋतुराज थोरात, ऋषिकेश शिंगटे ,गणेश जाधव,अभिजीत इंगळे, प्रथमेश कोळेकर ,नागेश शिर्के ,यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य ए. आर. कामतेकर,व कार्यक्रम समन्वयक पी. एस. सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्या व प्रोफेसर आणि ग्रामसेवक बोडेकर सर व आदर्श विद्यामंदिर भुईबावडा येथील शिक्षक घाडी सर, कांबळे सर पाटील मॅडम व शेतकरी ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते तसेच कृषिदुतांनी आयोजन केलेल्या कार्यक्रमाचे शिक्षक व ग्रामस्थांनी कौतुक केले