वेंगुर्ले (प्रतिनिधी) : कोकण कला व शिक्षण विकास संस्था व सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या विद्यमाने जिल्ह्यातील ५० दीव्यांग बांधवांना व त्यांच्या मुलांना कसाल येथील सिद्धिविनायक मंदिर सभागृह येथे नुकताच पार पडला. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा भाजपा सरचिटणीस प्रसन्ना (बाळू) देसाई, कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, साईकृपा अपंग संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे, कोकण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रथमेश सावंत, हुतात्मा अपंग बहुउद्देशीय संस्था सातारा अध्यक्ष सुनील फडतरे, साईकृपा अपंग संस्थचे पदाधिकारी श्यामसुंदर लोट, सुनील तांबे, मनोज सातोसे, सदाशिव राऊळ, अश्विनी पालव, कोकण संस्थेच्या वतीने तालुका समन्वयक समीर शिर्के, शशिकांत कासले उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०० हून अधिक दिव्यागं बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी संस्थेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केलं. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी आज आषाढी एकादशी निमित्त अनेक भक्त पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घेतात. कोकण संस्था आपल्या सामाजिक, समाज उपयोगी कार्यातून अशा अनेक दिव्यांग बांधवांच्या रूपाने विठुरायाच्या दर्शन घेतलं. समाज उपयोगी कार्य करणे हीच आमची पंढरी आणि आणि हेच आमचे विठुमाऊली असे मत व्यक्त केले. आजच्या दिवशी आपण अशा लोकांची कोकण संस्थेच्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप करून सेवा करू शकलो याचे समाधान ही व्यक्त केले.
आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनिल शिंगाडे यांनी कोकण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना दिलेल्या शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्दल संस्थेचे आभार व्यक्त केले. साईकृपा अपंग संस्थेचे सुनील जाधव, प्रसन्ना शिर्के, श्रीम.दळवी, कु.मेस्त्री यांचे सहकार्य मिळाले.