विठ्ठल रखुमाई व वारकरी वेशभूषेत विद्यालयातील किलबिल स्कूलचे विद्यार्थी सहभागी
वैभववाडी (प्रतिनिधी) : आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात सर्वत्र वारकरी संप्रदायासह ग्रामस्थ विठ्ठलाच्या चरणी लीन झाले होते. वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे प्रशालेत सांस्कृतिक विभागाच्या वतीने आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. या निमित्ताने प्रशालेतील किलबिल स्कूलचे विद्यार्थी विठ्ठल रखुमाई व वारकरी वेशभूषेत सहभागी झाले होते. त्यांची वेशभूषा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. विठ्ठलाच्या अभंगाच्या ओळी म्हणत विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई भोवती फेर धरला. अतिशय उत्साहात आषाढी एकादशी विद्यालयात साजरी करण्यात आली.
यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, पर्यवेक्षक एस बी शिंदे, माध्यमिक विभाग प्रमुख एस.एस.पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख व्ही.एस.मरळकर प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.