कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षा २०२४ मधील २ री व ३ री इयत्तेतील सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्ता यादी तील प्रथम पाच अशा १० गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरुपात मंगळवार दिनांक २३ जुलै २०२४ रोजी गोवा सायन्स सेंटर येथे भेटीसाठी घेऊन जाण्यात येणार आहे. या सहली दरम्यान पणजी येथील लायब्ररी आणि केसरी ॲक्वेरीयम ला भेटीचा आनंद मुलांना देण्यात येणार आहे.
या सहलीचा प्रारंभ मंगळवार दिनांक २३ जुलै २०२४ रोजी सकाळी ७:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन होईल.युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मा.सौ संजना संदेश सावंत आणि संस्थापक अध्यक्ष मा.श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या संकल्पनेतून या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे या सहलीमुळे शालेय विद्यार्थ्यांना गोवा सायन्स सेंटर सोबतच पर्यटन स्थळांना भेट देता येणार आहे.
गोवा सेंटर साठी निवडलेल्या विद्यार्थ्यांची नावे
इयत्ता 2 री : 1.स्वराध्या निलेश पेडणेकर, मठ नंबर एक , वेंगुर्ला 2.शांभवीउत्तम मोहिते, पडेल गावकरवाडी, देवगड 3.सन्मतीश अमर पाटील, म्हापण खालचा वाडा 4 .रिषभ नागेश जाधव, कसाल कुंभारवाडी 5.नम्रता नंदकुमार सोनटक्के, आचरे पिरावाडी, मालवण
इयत्ता 3 री : 1.उत्कर्ष उत्तम तानवडे, शासकीय वसाहत कोनाळकट्टा 2.आराध्या अमोल आपटे, सुधाताई वामनराव कामत विद्यालय 3.पियुष विजय लाड,नेरुळ शिरसोस 4.रेयांश संदीप कोळसुलकर, वेंगुर्ला नंबर ३ 5.रुद्रा राहुल कानडे
कुडाळ पडतेवाडी या आधी 18 जून ते 21 जून 2024 या कालावधीत 4 थी, 6 वी व 7 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने ईस्त्रो भेटीसाठी घेऊन जाण्यात आले होते.