एस.एस.पी.एम. संचलित डेअरी कॉलेजचा निकाल 100 टक्के

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर संलग्न एस.एस.पी.एम पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय (डेअरी कॉलेज) हरकुळ बु. कणकवली शैक्षणिक वर्ष सन 2023-24 अंतिम वर्षाचा निकाल नुकताच जाहिर झाला असून विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला आहे.

विद्यालयात शुभम सुभाष वायंगणकर 85.64 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, तर अमीत संतोष निकम 81.71 टक्के गुण मिळवून द्वितीय व सागर भास्कर धामापूरकर 81.64 टक्के गुण मिळवून तृतीय उत्तीर्ण झाले आहेत.

शैक्षणिक वर्ष 2023-24 सत्रात अंतिम परिक्षेला एकूण 56 विद्यार्थी बसले होते. विद्यालयाचे 11 विद्यार्थी प्राविण्यसहीत प्रथम श्रेणीत, तर 33 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व 12 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे.
विद्यालयाने 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. संस्थेचे संस्थापक केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खा. नारायण राणे, अध्यक्ष निलम राणे, माजी खा. निलेश राणे, संस्थेचे सचिव आ. नितेश राणे, कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रसाद सावंत व इतर शिक्षकवर्ग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!