नवीन कुर्ली प्रा. शाळा येथे कै. शिवराम पवार यांच्या स्मरणार्थ मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाकडून आयोजन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाच्या सौजन्याने कै. शिवराम हरी पवार (गावकर दादा) यांच्या स्मरणार्थ इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये नवीन कुर्ली प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवी तसेच आठवी ते दहावी मध्ये जे गावातील विद्यार्थी इतर शाळेत शिकत आहेत त्यांना सुध्दा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात कै. शिवराम पवार यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना वरवडेकर मॅडम यांनी केली, सूत्रसंचालन हुंबे यांनी केले तसेच शाळेच्या वतीने जोशी मॅडम यांनी आभार व्यक्त केले.

या प्रसंगी नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते,सचिव धीरज हुंबे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित दळवी, शाळेच्या मुख्याध्यापिका जोशी मॅडम, कृष्णा परब, मारुती पवार, सदानंद राणे, मिलिंद पवार, प्रमोद पवार, प्रकाश दळवी, कृष्णा पवार,पांडुरंग चव्हाण, सुरेंद्र पवार, अतुल डऊर, गजानन पवार,अंकुश पिळणकर, निलेश पवार,जनार्धन पवार, योगिता मडवी तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व शिक्षण प्रेमी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!