आचरा (प्रतिनिधी) : बुधवळे गोठणे मार्गावरील कॉजवेची उंची कमी असल्याने जास्तीचा पाऊस पडला की पाणी पुलावरून वाहू लागत असल्याने सदर मार्ग वाहतुकीस बंद होतो. वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. याठिकाणी कॉजवे ऐवजी पुल होणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत, शाळा, तलाठी कार्यालय या वहाळाच्या पलीकडे असल्याने दुरवरुन पायपीट करून जावे लागते. तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी बुधवळे ग्रामस्थांची मागणी आहे.