भाजपा वैभववाडी तालुकाध्यक्ष पदी सुधीर नकाशे यांची निवड

आ. नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिले नियुक्ती पत्र

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका भाजपा तालुकाध्यक्ष पदी जि.प.सदस्य सुधीर नकाशे यांची आज जिल्हा भाजपाच्या वतीने निवड करण्यात आली आहे. या निवडी बद्दल महाराष्ट्र राज्य सह. पणन महासंघाचे संचालक, वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन, भाजपाचे विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी सुधीर नकाशे यांचे अभिनंदन केले व पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. सुधीर नकाशे यांच्या या निवडीबद्दल संपूर्ण तालुक्यात त्यांचे अभिनंदन होत आहे.
कणकवली देवगड वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, अजित गोगटे उपस्थित होते.

error: Content is protected !!