१३ ऑगस्ट रोजी खारेपाटण महाविद्यालय येथे DLLE कार्यशाळेचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण येथे मंगळवार दि.१३ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागच्या वतीने एक दिवसीय प्रथम सत्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात खारेपाटण महाविद्यालयात आले आहे. या कार्यशाळेमध्ये DLLE विभागांअंतर्गत घेण्यात येणाऱ्या प्रकल्पाची माहिती, सामाजिक उपक्रम, पथनाट्य, व विविध स्पर्धा या विषयी व अशा अनेक विषयांवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या सन २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षासाठी मुंबई विद्यापीठाने आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या सर्व विस्तारकार्य शिक्षक व विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण चे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९.३० ते ३ या वेळेत सदर कार्यशाळा संपन्न होणार असून मुंबई विद्यापीठाचे आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. कुणाल जाधव सर प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील जिल्हा समन्वयक तसेच खारेपाटण पंचकोशी शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे व संस्थेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत. खारेपाटण महाविद्यालयाचे विस्तारकार्य शिक्षक प्रा. गजानन व्हंकळी व सर्व प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. तरी या कार्यशाळेमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन खारेपाटण महविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!