सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या वेंगुर्ला शाखेत झालेल्या कथित अपहाराला वाचा फोडून मालक सभासदांना न्याय मिळावा. वेंगुर्ला शाखाधिकारी यांच्यासह सर्व दोषींवर कारवाई व्हावी. या मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भरती व प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीने सिंधुदुर्ग नगरी येथील पतसंस्थेच्या समोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी शाखा वेंगुर्ला शाखाधिकार्याकडून ४१ लाखाची आर्थिक अनियमितता झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत आज सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी सिंधुदुर्गनगरी येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्ग व अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले. झालेल्या अपहरला वाचा फ़ोढून मालक सभासदांना न्याय मिळावा. तसेच झालेल्या अपराची माहिती देण्यासाठी संचालक मंडळाने विशेष सभेचे आयोजन करावे. संशयीत दप्तराची हाताळणी त्रयस्त यंत्रणेमार्फत करावी, वेंगुर्ला शाखाधिकारी यांच्यासह सर्व दोषींवर कारवाई करावी, स्वातंत्र यंत्रणेमार्फत सर्व शाखांची फेर तपासणी करावी आदी मागण्यासाठी आज अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजा कविटकर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्ग अध्यक्ष संतोष पाताडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले .यावेळी म ल देसाई, प्रकाश दळवी, के टी चव्हाण, आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने पतसंस्थेचे सभासद शिक्षक उपस्थित होते.